प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध कत्तलखान्यांवर जसा कायद्याचा बडगा चालवला आहे, त्याच पावलांवर महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकारने देखील पाऊल टाकले आहे. Shinde in Yogi’s footsteps – Fadnavis’ footsteps; Income tax raids on slaughterhouses in Maharashtra
महाराष्ट्रातील कत्तलखान्यांवर मंगळवारपासूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी छापे घालत आहेत. मालेगाव शहरातील कत्तलखान्यांवर गुरुवारी पुन्हा एकदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले. मालेगाव, पुणे, भिवंडी, मुंबई, सोलापूर या शहरांसह राज्यभरातील कत्तलखान्यांवर ही कारवाई सुरू आहे. कत्तखान्यांनी दिलेल्या विवरण पत्रात काही त्रूटी असल्याने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांवर छापे घातल्यानंतर, कारवाई करताना कामगारांना कंपनीतून बाहेर काढले आहे.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने अवैध कत्तलखान्यांवर कायद्याचा बडगा चालविला आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. याच पद्धतीची कारवाई आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
Shinde in Yogi’s footsteps – Fadnavis’ footsteps; Income tax raids on slaughterhouses in Maharashtra
महत्वाच्या बातम्या