प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही गोड बातमी दिली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. Shinde-Fadnavis government award to government employees
ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
– ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या गाड्यांमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.
Shinde-Fadnavis government award to government employees
महत्वाच्या बातम्या
- 17 ऑगस्ट 2022 : राष्ट्रगीत समूह गायन, विश्वविक्रमाची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई
- फिफाने भारताला दिला दणका, एआयएफएफचे निलंबन; महिला विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले
- वंदे मातरमला विरोध : रझा अकादमीच्या पावलावर काँग्रेसचे पाऊल!!