प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी 4500 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करताना सुमारे पंधराशे कोटी रुपयांचे निधी वाटप सर्वपक्षीय आमदारांना केले. मात्र त्या संदर्भात ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी ठरले. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरभरून निधी दिला. पण शिंदे गटाच्या आमदारांवर अन्याय केला, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला होता. हा आरोप अजित पवारांनी आज फेटाळून लावला.Shinde – Fadnavis: Ajit Dada rejects claim of any injustice in fund allocation!!
आमदार निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्वांना समसमान निधी दिलेला आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना नेहमीप्रमाणे झुकते माप देतील आणि तसेच घडले, असा आरोप ठाकरे गटाने केला होता. मात्र त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाचा इन्कार केला होता. अजितदादांनी शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी तसेच बाकीच्या पक्षांच्याही आमदारांना निधी दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले होते. त्याचाच पुनरुच्चार आज अजितदादांनी केला.
अजितदादांवर शिंदे – फडणवीसांचे नियंत्रण
वास्तविक शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर अजित मदादा आता दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिलेले नसून, ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. अजितदादांच्या अर्थमंत्री म्हणून असलेल्या प्रत्येक फाईलवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “नजर” आहे. अंतिम निर्णय शिंदे – फडणवीसांनी घेतला आहे. त्यामुळे 1500 कोटी रुपयांचा निधी वाटल्यास राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी मिळाला असला तरी तो इतरांनाही पुरेसा मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.
Shinde – Fadnavis: Ajit Dada rejects claim of any injustice in fund allocation!!
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नसतो तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत तुरुंगात गेले असते’, राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांचा गौप्यस्फोट!
- दिल्लीत पावसाचा कहर, यमुनेने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागातून लोकांचे स्थलांतर, हिमाचलच्या पुरात 7 ठार
- खलिस्तान्यांना ड्रग्स तस्करांची फंडिंग, NIAच्या आरोपपत्रात दहशतवादी भरतीसह आंतरराष्ट्रीय संबंधही उघड
- Gyanvapi Case : ‘ज्ञानवापी’चे ASI सर्वेक्षण सुरू, ३०पेक्षा अधिक सदस्यांची टीम सकाळीच झाली दाखल!