• Download App
    प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव|Shilpa Shetty alleges that the image is being tarnished, runs in the High Court against the media

    प्रतिमा मलिन म्हणून शिल्पा शेट्टीचा २९ माध्यमांविरोधात प्रत्येकी २५ कोटींचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राची पत्नी आणि प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपली प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप केला आहे. चुकीचे वार्तांकन करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा प्रकारे मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या मीडिया हाऊसना वार्तांकन करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने न्यायालयाकडे केली आहे.Shilpa Shetty alleges that the image is being tarnished, runs in the High Court against the media

    शिल्पा शेट्टी हिने म्हटले आहे की, राज कुंद्रा याच्या अटकेनंतर काही माध्यम संस्थांनी त्यांची रीडरशिप व टीआरपी वाढवण्यासाठी तथ्यहीन लेख लिहिले आणि त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केले. शिल्पाने याप्रकरणी गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूबसह २९ जणांना प्रतिवादी केले आहे.



    या सर्व सोशल मीडियावरून बदनामीकारक मजकूर हटविण्यात यावा, अशी मागणी तिने केली आहे. तसेच त्यांना सशर्त माफी मागण्याचे व मानहानी म्हणून प्रत्येकी २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी शिल्पा शेट्टी हिने केली आहे. या दाव्यावरील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

    राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची झाडाझडती घेतली होती. तसेच शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात होती. राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म्स निर्मितीशी संबंध असल्याची माहिती शिल्पाला होती का? अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली.

    राज कुंद्राला घेऊन पोलीस शिल्पाच्या पॉर्न फिल्म्स निर्मिती करणाऱ्या विआन कंपनीच्या संचालकपदी शिल्पा शेट्टी होती. मात्र, तिने नंतर विआन उद्योगाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. विआन कंपनीने निर्मिती आणि विक्री केलेल्या पॉर्न फिल्म्समधून शिल्पा शेट्टीलाहा आर्थिक लाभ झाला का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

    विआन कंपनीच्या संचालक पदावर शिल्पा शेट्टी किती काळ होती? तिला अश्लील चित्रपट निर्मितीबाबत काही कल्पना होती का? या रॅकेटचा कारभार विआन कंपनीच्या ऑफिस मधून चालत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे २०२० मध्ये तिने विआन कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा का दिला होता?

    या संदर्भात शिल्पाची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचाही तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विआन कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. ते कुणी डिलीट केले याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.

    Shilpa Shetty alleges that the image is being tarnished, runs in the High Court against the media

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस