• Download App
    शरद पवारांची अवस्था म्हणजे "मजबूरी का नाम महात्मा गांधी"; रावसाहेब पाटील दानवेंचे शरसंधान!! Sharasandhan of Raosaheb Patil Danve

    शरद पवारांची अवस्था म्हणजे “मजबूरी का नाम महात्मा गांधी”; रावसाहेब पाटील दानवेंचे शरसंधान!!

    प्रतिनिधी

    जालना :  महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी खोचक शब्दात टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार शरद पवारांना अजिबात पटत नाही. पण शरद पवार यांची अवस्था “मजबूरी का नाम महात्मा गांधी”, अशी झाली आहे असे शरसंधान रावसाहेब पाटील दानवे यांनी सोडले आहे. Sharasandhan of Raosaheb Patil Danve

    रावसाहेब पाटील दानवे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आणि होळीच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सादर केलेल्या पेन ड्राईव्हची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

    – आघाडीचे आमदार फुटतील

    महाविकास आघाडीचेच 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. एकदा निवडणुका येऊ द्या, एक एक आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील. महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, रावसाहेब पाटील दानवे यांनी केला आहे.



    – शिवसेना आमदार बंडाच्या पवित्र्यात

    पण त्यामुळे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. कारण निधी वाटपात अर्थमंत्री अजित पवार शिवसेना आमदारांवर अन्याय करत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे 25 आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत.

    – नावे सांगणार नाही

    भाजपचे आमदार राष्ट्रवादी जातील, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो, अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. महाविकास आघाडीचेच आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असेही ते म्हणाले.

    – शिवसेनेने आता हिरवा पांघरले

    रावसाहेब दानवे म्हणाले की, “ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय आणि आता हिरव्याचं समर्थन करतात. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावं. भेसळ दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते.”

    – दाऊदशी मनी लॉन्ड्रिंग

    रावसाहेब दानवे पुढे म्हणाली की, “दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी मनी लॉन्ड्रिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या महाविकास आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही. भगवाधारी सगळे फक्त आमच्याकडेच आहेत.

    – अब्दुल सत्तार यांची शिवसेना

    आम्ही पाठीत वार कधी केला नाही तर यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झालीय अशीही त्यांनी टीका केली.

    Sharasandhan of Raosaheb Patil Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!