प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर शरद पवार उभे राहिले असते तर ते पारडे फिरवू शकले असते, असे वक्तव्य करून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाचा विषय उकरून काढला आहे.
Sharad Pawar would have turned the tide; Praise key from Sanjay Raut
राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही आणि आपल्याला सक्रिय राजकारणात राहायचे आहे, असे या दोन मुद्द्यांवर शरद पवारांनी स्वतःहून राष्ट्रपतीपदाची विरोधी पक्षांची उमेदवारी नाकारली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत देखील पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी देखील शिवसेनेने शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. ही बैठक होऊन 2 दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पवारांच्या राष्ट्रपतिपदाचा विषय उकरून काढला आहे.
स्वतः शरद पवार यांनीच निवडणूक लढवायला नकार दिल्यामुळे आम्हाला मर्यादा आल्या. अन्यथा शरद पवारांनी निवडणूक लढवली असती तर त्यांच्या एवढा तगडा उमेदवार सत्ताधारी भाजपला उभा करता आला नसता आणि शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पारडे फिरवले असते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र स्वतः शरद पवारांनी आपली राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर देखील संजय राऊत पुन्हा पुन्हा तोच मुद्दा उकरून काढून शरद पवारांच्या राजकीय क्षमतेची स्तुती करत आहेत की त्यांना डिवचत आहेत??, या मुद्द्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Sharad Pawar would have turned the tide; Praise key from Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- दानवे × देसाई : राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले; विधान परिषद निवडणुकीत “मांजराची पिल्लं” गाजताहेत!!
- देहूतील (न)भाषण : अजितदादा म्हणाले, विषय संपला!!; फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतून षडयंत्र!!
- महाराष्ट्र भाजप : बारामतीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी “राजकीय वात” राम शिंदेंच्या हाती!!