• Download App
    कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती sharad pawar praise CM uddhav thackeray in shyadri meeting, before he met mr. thackeray at Varsha; claims dada bhuse

    कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती

    प्रतिनिधी

    मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची बातमी आली. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी शरद पवारांनी एका बैठकीत उध्दव ठाकरे यांच्या कामाचे कौतूक केले. त्यांनी कोरोना काळात वडिलांप्रमाणे भूमिका निभावली, असे उद्गार शरद पवारांनी काढल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. sharad pawar praise CM uddhav thackeray in shyadri meeting, before he met mr. thackeray at Varsha; claims dada bhuse

    शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वतः कृषी मंत्री दादा भूसे, परिवहन मंत्री अनिल परब यांची उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी माहिती दिली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केले आहे. वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी काढल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

    सह्याद्रीतल्या बैठकीनंतर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी गेले होते. वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, महाविकास आघाडीतील धुसफूस, विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे शिवसेना आणि राष्ट्रवादीवर शरसंधान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यावर असलेली ED ची टांगती तलवार या विषयांवर ठाकरे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मात्र चर्चेचा अधिकृत तपशील मात्र समोर येऊ शकला नाही.

    sharad pawar praise CM uddhav thackeray in shyadri meeting, before he met mr. thackeray at Varsha; claims dada bhuse

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य