• Download App
    69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत!! Sharad pawar insulted dada jadhavrao in 2004 election

    69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : 5 जुलै 2023 महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक अशी तारीख की ज्या तारखेला इतिहासाने करवट बदलली… महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी गेली कित्येक वर्षे उभे केलेले चाणक्यगिरीचे एक मिथक या दिवशी उद्ध्वस्त झाले. काकांच्या चाणक्यगिरीचे मिथक पुतण्यानेच उध्वस्त केले!! Sharad pawar insulted dada jadhavrao in 2004 election

    पण हेच काका 83 वर्षांचे योद्धा असल्याचा “साक्षात्कार” राजकीय कवचात सुरक्षित असलेल्या 54 वर्षांच्या योद्धा कन्येला झाला आहे. पण हा 83 वर्षांचा योद्धा जेव्हा तुलनेने तरुण होता, तेव्हा तो सत्तरीत असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना काय म्हणत होता??, त्याचे एक उदाहरण समोर आले आहे.

    • ते असे :

    सन 2004 : “बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो,” असे शरद पवार म्हणाले होते. पुरंदर विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

    शरद पवार ज्यांना “म्हातारा बैल” म्हणाले होते, ते होते सुरसिंह उर्फ दादा जाधवराव. दादा जाधवराव यांचे वय त्यावेळी 69 वर्षांचे होते. शरद पवारही तेव्हा तरुण नव्हतेच. पवारांचे वय त्यावेळी 64 वर्षांचे म्हणजे दादांपेक्षा फक्त 5 वर्षांनी कमी होते.

    5 जुलै 2023 शरद पवार यांच्या एवढे असभ्यपणे न बोलता अजित पवार यांनी त्यांच्या ‘वरिष्ठां’ना विचारले, की या वयात तुम्ही कधी थांबणार आहात की नाही??

    … बरं हा प्रश्न विचारताना अजित पवार यांचे वय 64 आहे. 69 वर्षांच्या एका ज्येष्ठ नेत्याला ते म्हातारे म्हणून बैल बाजार दाखवायला निघालेले अजितदादांचे “वरिष्ठ” आज 83 वर्षांचे योद्धा आहेत!!

    दादा जाधवराव यांचा भव्य नागरी सत्कार

    दादा जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त 29 जून 2023 ला पुरंदर तालुक्यातील जनतेने जाहीर नागरी सत्कार केला. या सत्कार सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होते.

    सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन दादा जाधवराव गौरव समिती आणि दादा जाधवराव विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.

    Sharad pawar insulted dada jadhavrao in 2004 election

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!