विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतल्याची पत्रकार परिषद घेताना अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा बचाव करण्यासाठी शरद पवार मदतीला आले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले,काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो, तो अजितदादांना नाही. Sharad Pawar came to Ajitdad’s help, said don’t spread wrong information
काही लोकांना वृत्तपत्रांमध्ये नावे यावी यासाठी ते कामे करतात तर काही लोक फक्त कामे करण्यासाठी प्रसिद्ध असतात. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे सर्वांना माहिती आहे. मी देखील जेव्हा कोणी भेटते तेव्हा त्यांची चर्चा करतो याचा अर्थ असा नसतो की, त्या चर्चा राजकीय असतात. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा गैर अर्थ काढला जातो. माजी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया अजित दादांच्या बाबती चुकीची वृत्त पसरवू नका, असं पवार म्हणाले.
Sharad Pawar came to Ajitdad’s help, said don’t spread wrong information
महत्वाच्या बातम्या
- बारसूत रिफायनरी प्रकल्प केला, तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र पेटवण्याची भाषा
- कोविड ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, WHO प्रमुख म्हणाले – एका वर्षापासून रुग्णसंख्येत होतेय
- कुस्तीपटूंच्या संपाचा 14 वा दिवस, FIRमध्ये 5 घटनांचा उल्लेख, बहाण्याने पोट आणि स्तनांना स्पर्श केला, वैयक्तिक नंबर मागितला
- राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात प्रचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा!!