• Download App
    जुने जाऊ द्या, नवे घ्या ते सुप्रीम कोर्टात जा!!; उद्धव ठाकरेंना सल्ले देतानाही पवार - आंबेडकर परस्परविरोधीच!! Sharad Pawar and prakash Ambedkar gave contradictory suggestions to Uddhav Thackeray over election commission verdict of Shivsena symbol

    जुने जाऊ द्या, नवे घ्या ते सुप्रीम कोर्टात जा!!; उद्धव ठाकरेंना सल्ले देतानाही पवार – आंबेडकर परस्परविरोधीच!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे राजकारणात अहि – नकुलाचे म्हणजे साप – मुंगसाचे नाते आहे, हे सर्वश्रुत आहे. पण दुसऱ्याला सल्ले देतानाही ते परस्पर विरोधी सल्ले देतात, हे देखील आता पुढे आले आहे. Sharad Pawar and prakash Ambedkar gave contradictory suggestions to Uddhav Thackeray over election commission verdict of Shivsena symbol

    उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी परस्पर विरोधी सल्ले दिले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह या बाबत उद्धव ठाकरेंना प्रतिकूल निकाल दिला. त्यावर पवार – आंबेडकरांनी परस्परविरोधी सल्ले दिले आहेत. जुने चिन्ह आणि नाव जाऊ द्या. नवे स्वीकारा. 15 दिवस लोक चर्चा करतील. नंतर लोक विसरून जातील आणि लोक नवे चिन्ह – नाव स्वीकारतील, असा सल्ला शरद पवारांनी दिला, तर प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्ट जाण्याचा सल्ला दिला.



     

    निवडणुका घेणे म्हणजे त्यांचे संचालन करणे हा निवडणूक आयोगाचा स्वतंत्र अधिकार आहे. पण पक्षांतर्गत राजकीय झगड्यांमध्ये निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असा दावा करून प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय योग्यच असल्याचे असल्याचा निर्वाळा दिला आहे.

    आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टात जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे वेगळाच पेच देखील तयार झाला आहे. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली आहे. ते महाविकास आघाडीत देखील येऊ इच्छित आहेत. पण त्याच वेळी ते शरद पवारांच्या प्रत्येक निर्णयाला अथवा सल्ल्याला देखील परस्पर विरोधी वक्तव्य करून छेद देत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे आणि महाविकास आघाडीचे सूत कसे जमणार?, यावर ठळक प्रश्नचिन्ह कायम आहे.

    Sharad Pawar and prakash Ambedkar gave contradictory suggestions to Uddhav Thackeray over election commission verdict of Shivsena symbol

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस