- दरम्यान ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार लसीकरणाला गती देत आहे. Seven states, including Maharashtra and Uttar Pradesh, will receive the Zykov-D vaccine for Zydus Cadila
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असताना आता कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरिएंट नवीन संकट वाढवताना दिसून येत आहे.हा विषाणू अवघ्या आठ दिवसात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल २३ देशांमध्ये पसरला आहे.दरम्यान ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार लसीकरणाला गती देत आहे.
याच अनुषंगाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह सात राज्यांना झायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी लस देण्यात येणार आहे.अजूनपर्यंत लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रौढांना ही लस देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पंजाब, तामीळनाडू या सात राज्यांना ही लस दिली जाणार आहे.
जायकोव्ह-डी तीन डोसची लस असून ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड पंट्रोल ऑर्गनायझेशन’ने अलीकडेच 12 वर्षे व त्यापुढील मुलांसाठी या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली होती. मात्र या लसीचा सध्या प्राधान्याने सात राज्यांतील प्रौढ नागरिकांसाठी वापर केला जाणार आहे.
Seven states, including Maharashtra and Uttar Pradesh, will receive the Zykov-D vaccine for Zydus Cadila
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड