Adar Poonawala : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न करता लस निर्यात केल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. अशा प्रकारच्या आरोपांवर आता दस्तुरखुद्द सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पूनावाला यांनी दीर्घ स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या कंपनीने भारतीयांच्या जीव पणाला लावून लसीची निर्यात कधीही केली नाही. Serum Institute CEO Adar Poonawala Said Never Exported Vaccines At Cost Of Indian People
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न करता लस निर्यात केल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. अशा प्रकारच्या आरोपांवर आता दस्तुरखुद्द सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पूनावाला यांनी दीर्घ स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या कंपनीने भारतीयांच्या जीव पणाला लावून लसीची निर्यात कधीही केली नाही.
सीरम इन्स्टिट्यूटमार्फत एक निवेदन जारी करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, ज्या वेळी लसीची निर्यात झाली, त्यावेळी इतर देशांमधील परिस्थिती भारतापेक्षा वाईट होती. ते म्हणाले की, भारतात जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली होती तेव्हा कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे ओसरत आली होती, आणि तेव्हा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसह बहुतांश जणांना असे वाटत होते की, भारत या कोविड संकटातून बाहेर आला आहे. परंतु त्याच वेळी इतर देशांमध्ये कोरोनाच्या लाटेने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या परिस्थितीत लस देशाबाहेर पाठवण्यात आली होती.
2- 3 महिन्यांत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण अशक्य
भारतातील लसीकरणाबद्दल अदार पूनावाला म्हणाले की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे हे एक मोठे आव्हान आहे आणि हे काम 2-3 महिन्यांत पूर्ण करता येणार नाही. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारताची लोकसंख्या पाहिल्यास सर्वांचे लसीकरण 2-3 महिन्यांत अशक्य आहे. ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेदरम्यान बरीच आव्हाने उद्भवली आहेत, अवघ्या जगभरातील लोकांना लस देण्यास 2-3 वर्षे लागतील. उल्लेखनीय म्हणजे, विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर आरोपांची राळ उडवत असताना लस निर्मात्यांकडून हे निवेदन आले आहे.
अदार पूनावाला म्हणाले, जानेवारी 2021 मध्ये आपल्याकडे लसींचा मोठा साठा होता. आपली लसीकरण मोहीम सुरू झाली होती, परंतु कोरोनाची रुग्णसंख्या सर्वात खालच्या स्तरावर होती. त्यावेळी आरोग्य तज्ज्ञांसह बहुतांश लोकांना वाटले की भारतातून ही महामारी संपली आहे. परंतु त्याच वेळी जगातील इतर अनेक देशांमध्ये गंभीर संकट होते आणि त्यांना मदतीची आवश्यकता होती. सरकारने या काळात सर्व शक्य मदत केली आहे. 2020 च्या सुरुवातीच्या काळात देशांमध्ये समान सहकार्याची भावना दिसून आली. देशांमधील हे सहकार्य आमच्यासाठी तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा समर्थनासाठी आधार आहे. एचसीक्यू आणि लसीचा पुरवठा करण्यासाठी भारताने इतर देशांना मदत केली आणि म्हणूनच आपल्याला इतर देशांकडूनही मदत मिळाली आहे.
ते म्हणाले की, सीरमने आतापर्यंत 20 कोटी डोस पुरवले आहेत, तथापि, अमेरिकन फार्मा कंपन्यांकडून दोन महिन्यांपासून ईयूए मिळालानही. पूनावालांनी स्पष्ट केले की, भारतीयांचे जीव पणाला लावून लसीची निर्यात केली नाही. सोबतच देशातील लसीकरण मोहीम मजबूत करण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याची प्रतिबद्धताही त्यांनी व्यक्त केली.
Serum Institute CEO Adar Poonawala Said Never Exported Vaccines At Cost Of Indian People
महत्त्वाच्या बातम्या
- थेट परकीय गुंतवणूक सार्वकालिक उच्च स्तरावर, परकीय गंगाजळीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ
- India Fights Back : दररोज होणार 45 लाख कोरोना चाचण्या, व्हेरिएंट्सच्या निगराणीसाठी 17 नव्या प्रयोगशाळा
- Kerala Cabinet : पिनरई मंत्रिमंडळात जावयाची वर्णी; पण कोरोना योद्धा केके शैलजांना धक्कादायकरीत्या नारळ
- Cyclone Tauktae चे तांडव, मुंबईहून 175 किमी अंतरावर भारतीय जहाज बुडाले, 130 जण बेपत्ता, नौदलामुळे 146 जण बचावले
- Congress Toolkit Leaked : ईद आनंदोत्सव, तर कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा