• Download App
    निखिल वागळे म्हणाले- हवीशी माणसं जातात अन् नकोशी राहतात; सोशल मीडियावर टीकेचा भडिमार । Senior Journalist Nikhil Wagle Facebook Post starts Controversy again

    निखिल वागळे म्हणाले- हवीशी माणसं जातात अन् नकोशी राहतात; सोशल मीडियावर सुरू झाला टीकेचा भडिमार

    Nikhil Wagle : प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आपल्या रोखठोक मतांसाठी, परखड विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आता त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते व खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. यानंतर निखिल वागळे यांनी त्यांना आदरांजली वाहणारी पोस्ट केली होती. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा फेसबुकवर लिहिले की, हवीशी माणसं जातात आणि नकोशी राहतात, हे काय गणित आहे? Senior Journalist Nikhil Wagle Facebook Post starts Controversy again


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आपल्या रोखठोक मतांसाठी, परखड विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आता त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते व खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. यानंतर निखिल वागळे यांनी त्यांना आदरांजली वाहणारी पोस्ट केली होती. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा फेसबुकवर लिहिले की, हवीशी माणसं जातात आणि नकोशी राहतात, हे काय गणित आहे?

    निखिल वागळे यांच्या याच फेसबुक पोस्टवरून टीकेची झोड उठली आहे. निखिल वागळेंना नकोशी असलेली कोणती माणसं मेलेली आवडेल, असा प्रश्न युजर्सकडून विचारला जात आहे. अनेक युजर्सनी निखिल वागळेंना उद्देशून खालच्या पातळीवर टीका केली आहे, तर अनेकांनी मेल्यावर हवे असणारे आणि नको असणारे असा भेद करत नसतात, असे खोड बोलही सुनावले आहेत.

    स्वत:ला उदारमतवादी म्हणवता आणि काहींच्या मृत्यूंची अपेक्षा कशी काय करू शकता? असा सवालही काही युजर्सनी सोशल मीडियावर वागळेंना केला आहे. निखिल वागळे यांनी पोस्टमध्ये कुणाचाही उल्लेख केलेला नसला तरी कुणाला त्यांचा कायम विरोध आहे, हेही सर्वज्ञात आहे.

    Senior Journalist Nikhil Wagle Facebook Post starts Controversy again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल