विशेष प्रतिनिधी
कल्याण : मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चौघांच्या टीममध्ये डोंबिवली जिमखान्याच्या तीन महिला खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. Selection of three Dombivli athletes for the Trampoline Gymnastics World Cup; Competition in Azerbaijan
श्रद्धा गावडे, राही पाखले, सिद्धी ब्रीद अशी या तीन खेळाडूची नावे असून चौथी खेळाडू आंध्रप्रदेशमधील आहे. या वर्ल्डकपमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल्यास या खेळाडूना ऑलिम्पिक मध्ये खेळण्याची संधी मिळू शकणार आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील खेळाडू पुन्हा जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सज्ज झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डोंबिवलीतील भोईर जिमखान्यात मागील अनेक वर्षापासून जिम्नॅस्टिक्सचे खेळाडू घडवले जात आहेत. मुकुंद भोईर यांच्या नंतर त्यांचा मुलगा पवन भोईर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेत खेळाडूना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमक दाखविण्याची संधी देत आहे. जिम्नॅस्टिक्स मधील ट्रम्पोलीन क्रीडा प्रकार डोंबिवलीत ६ वर्षापूर्वी सुरु करण्यात आला आहे. खेळाडू या प्रकाराकडे वळू लागले आहेत. अतिशय तालबद्ध आणि लयबद्ध पद्धतीने शरीराचा बॅलन्स सांभाळत या खेळाचे प्रदर्शन करताना खेळाडूला चातुर्य दाखवितानाच अखेरपर्यत स्टॅमीना राखून ठेवावा लागतो.
वर्ल्डकपसाठी भारताचा पुरुष आणि महिलाच संघ निवडण्यात आला आहे. पुरुषाच्या संघात सरकारी नोकरी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांबरोबरच भोईर जिमखान्यातील एका खेळाडूला संधी मिळाली. महिलाच्या गटातून मात्र भोईर जिमखान्याच्या तीन खेळाडूची निवड झाली आहे. या खेळाडू वर्ल्डकपला सामोरे जाण्यासाठी दिवसातून ४ ते ५ तास सराव करत आहेत. यापूर्वी या खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली असून वर्ल्डकपमध्ये पदकावर नाव कोरल्यास या खेळाडूना ऑलम्पिक स्पर्धेची कवाडे उघडतील.
श्रद्धा गावडे हिचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. मात्र एकुलत्या एका मुलीच्या खेळाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहन दिले आहे. मात्र आता वर्ल्डकप खेळण्यासाठीचा खर्चाचा भार पेलताना या खेळाडूच्या नाकीनऊ आले असून आपल्याला देखील इतर खेळातील खेळाडूप्रमाणे आर्थिक मदतीसाठी प्रायोजक मिळावेत, अशी या खेळाडूची मागणी आहे. आपल्या खेळाचे जागतिक पातळीवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद या तिन्ही खेळाडूनी व्यक्त केला असून खेळ सांभाळून त्या शिक्षण देखील घेत आहेत.
Selection of three Dombivli athletes for the Trampoline Gymnastics World Cup; Competition in Azerbaijan
महत्त्वाच्या बातम्या
- पी. चिदंबरम यांनाच गोव्यात कॉँग्रेसच्या विजयाबाबत शंका, म्हणाले शिवसेना- राष्ट्रवादीची मदत घेऊ
- संयुक्त राष्ट्र्रसंघातील मताचा संबंध पेगासशी जोडणे न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक, सय्यद अकबरुद्दीन यांची टीका
- इन्स्टाग्रामवर पन्नास हजार लाईक मिळावे म्हणून शिवीगाळ करणाऱ्या लेडी डॉनवर गुन्हा
- राहूल तर फेक गांधी, महात्मा गांधींचे स्वप्न भाजप पूर्ण करतोय, गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल
- कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात, कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान केले नाही, कपिल पाटील यांचा दावा