प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक कामांसंदर्भात पॅटर्न बदलले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा पॅटर्न बदलला आहे, तो म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांच्या कामांचा. मुंबईतील रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे आणि चांगल्या रस्त्यांवर वारंवार युटीलिटीज करता होणारे खोदकाम रस्त्यांच्या कामांचा दर्जा योग्य राखला जात नसल्याने आता रस्त्यांची कुंडलीच बनवून त्याद्वारे रस्ते कामांचा आराखडा बनवला जाणार आहे. रस्त्यांचा सर्वे करून त्याआधारे बांधकामांसाठी आता सल्लागारांची एक टिमच बनवून तिच्यात सहा सल्लागारांची निवड केली आहे. Selection of 6 Urban Design Consultants for Road Works in Mumbai
नाना पाटेकर यांना दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला होता, तो म्हणजे मुंबईतील रस्त्यांच्या कामांसंदर्भात अनेक कॉन्ट्रॅक्टर्स पात्रचङ ठरत नव्हते. त्यामध्ये एल अँड टी, टाटा अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश होता. याचा “बिटवीन द लाईन” असा की ठाकरे – पवार सरकारच्या काळात त्यांच्या मर्जीतल्याच कॉन्ट्रॅक्टर्सना रस्त्यांसह सगळी कामे दिली जात होती. शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी हा पॅटर्नच बदलून टाकला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी सल्लागारांची निवड हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे.
महापालिकेच्या रस्त्यांचा रचनेतील समस्यांचे निराकरण करून त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने काही शहरी संकल्पना सल्लागार अर्थात अर्बन डिझाईन कंसल्टंटचीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागारांच्या माध्यमातून विकास करण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठीचे सर्व आवश्यक सर्वेक्षण करणे आणि बांधकामाच्या दृष्टीकोनातून संकल्पचित्रे तथा आराखडाच्या अंमलबजावणीसाठी देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. 3 वर्षांकरता सल्लागारांची निवड केली असून 6 सल्लागारांची यासाठी निवड झाली आहे. यामध्ये सल्लागारांच्या पॅनेलमध्ये युडीएआय कन्सल्टंन्टस, आर्कोहम कन्सल्टस प्रायव्हेट लिमिडेट, आय. एम. काद्री आर्कीटेक्ट, शशी प्रभू अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि कास्टा इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
मुंबईतील रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अत्याधुनिक पध्दतीचा वापर करण्यासाठी रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून यापूर्वी हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये युटीलिटीज डकची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व रस्त्यांच्या बांधकामांमध्ये रस्त्यांवरील वाहनांच्या वर्दळीचा वापर करूनही त्यादृष्टीकोनातून आराखडा तयार करून रस्त्यांचे बांधकाम केले जाणार असल्याचे उपायुक्त (पायाभूत सेवा सुविधा) उल्हास महाले यांनी स्पष्ट केले. नियुक्त सल्लागारांच्या माध्यमातून रस्त्यांचे दर्जेदार काम करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Selection of 6 Urban Design Consultants for Road Works in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- सोने तस्करी प्रकरणाची ईडी केस कर्नाटकात हलवायला केरळच्या डाव्या सरकारचा विरोध
- मुंबईत रस्त्यांच्या कामांसाठी 6 अर्बन डिझाईन कंसल्टंटसची निवड; शिंदे – फडणवीस सरकारने बदलला पॅटर्न; कसा तो वाचा
- वर्षा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी : राज ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??