• Download App
    पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या पीएफआय पाठीराख्यांवर देशद्रोहाची कलमे!Sedition charges against PFI supporters who called Pakistan Zindabad in Pune

    पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या पीएफआय पाठीराख्यांवर देशद्रोहाची कलमे!

    प्रतिनिधी

    पुणे : देशात दहशतवादी कारवाया माजविण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने कायद्याचा वरवंटा फिरवल्यानंतर केरळ आणि महाराष्ट्रात पीएफआरच्या पाठीराख्यांनी हिंसक आंदोलन केले. Sedition charges against PFI supporters who called Pakistan Zindabad in Pune

    पुण्यातल्या आंदोलनादरम्यान त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. आता अशा घोषणा देणाऱ्या पीएफआयच्या पाठीराख्यांवर पुणे पोलिसांनी देशद्रोहाची कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे.

    पीएफआयच्या या पाठीराख्यांविरुद्ध सुरुवातीला पुणे पोलिसांनी बेकायदा जमाव जमावणे, परवानगी नसताना आंदोलन करणे, अशा आशयाचे गुन्हे लावले होते. परंतु, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यां विरुद्ध देशद्रोहाची कलमे लावून गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले.

    त्यानंतर पुणे पोलिसांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 153, 124, 109 आणि 120 ब अंतर्गत देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. आता या सर्वांचा तपास आणि चौकशी याच कलमांतर्गत होऊन त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये खटले दाखल केले जातील.

    Sedition charges against PFI supporters who called Pakistan Zindabad in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!