प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या तोंडावर शनिवारी, १० डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे शाई फेकण्यात आली. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मात्र, या गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमावरुन आता वाद सुरू झाला आहे. Section 307 on ink thrower
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि राजू शेट्टी यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ज्याने शाई फेकली त्याच्यावर 307 कलम लावले, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलेच नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे, तर राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला तालिबानी पद्धतीने वागू नका, असा इशारा दिला आहे. त्यावर चंद्रकांतदादांनी हे कलम का लावण्यात आले यांचे उत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
शनिवारी झालेली शाईफेक ही पूर्व नियोजित होती. याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही. पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांना जाऊन सांगा की, माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाल, असे म्हणत छगन भुजबळ अजून जामिनावर आहेत हे विसरू नये, असेही पाटील म्हणाले.
Section 307 on ink thrower
महत्वाच्या बातम्या