प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव संपत असतानाअहमदनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांच्या धोक्यामुळे शिर्डीत पोलीस सतर्क झाले आहेत.Section 144 applied in Ahmednagar; Danger of terrorist action, high alert in Shirdi!!
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसाॅर्ट किंवा हाॅटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता लोकांना राहण्यासाठी रुम देणा-या हाॅटेल मालकांवरही कारवाई केली जाणार आहे.
देशभरातून असंख्य भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे शिर्डी पोलिसांना मिळालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी सतर्कतेचे पाऊल उचलत अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिर्डीत हाय अलर्टवर जारी करण्यात आले आहे.
Section 144 applied in Ahmednagar; Danger of terrorist action, high alert in Shirdi!!
महत्वाच्या बातम्या
- आधी एकत्र येऊ, मग नेता निवडू : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट
- पीएम- श्री अंतर्गत देशभरातील 14,597 शाळा होणार अद्ययावत : पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेस मंजुरी
- नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळ विस्तार : स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सागितली वेळ
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण!!; महाराष्ट्रभर संताप!!