नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.144 applicable in Nashik city, new amended order issued by the Commissioner of Police
विशेष प्रतिनिधी
नाशिक : कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत.दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध घालण्यासाठी नाशिक शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
तसेच दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे.तसेच नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.
नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार
१)जलतरण तलाव , ब्युटी पार्लर स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार .
२शहरातील सर्व उद्याने, किल्ले, प्राणी संग्रहालये आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
३) खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असून कामाचे विभाजन २४ तासात करणार.
४) खासगी कार्यालये २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.
Section 144 applicable in Nashik city, new amended order issued by the Commissioner of Police
महत्त्वाच्या बातम्या
- भोसरी एमआयडीसी प्रकरण, मंदा खडसे यांना १७ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
- ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी बॉक्सर लवलीना झाली डीएसपी
- ग्रामीण भागात ओमिक्रॉन फैलावतोय ; मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, साताऱ्यासह नगरमध्ये रुग्ण वाढले
- संसद भवनामध्ये कोरोनाचा उद्रेक ; तब्बल ७१८ कर्मचारी लागण; अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे संकट