नाशिक : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठाकरे आणि शिवसेना नाव वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते ते आव्हान एकनाथ शिंदे यांनी धुडकावले असून आपल्या गटाचे नाव “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असेच ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या नावातून ना शिवसेना वगळली, ना बाळासाहेब ठाकरे!!… याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या भूमिकेत सातत्य ठेवले आहे!! SBT : eknath shinde names his party Shivsena balasaheb Thackeray
गेल्या 5 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र भूमिका सातत्याने बदलली आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नरमाईची भूमिका घेऊन राजीनाम्याची तयारी केली आणि दाखवली. शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री पद सोडण्यापासून रोखले. नंतर त्यांनी फक्त “वर्षा” बंगला सोडून दिला आणि नंतर बंडखोरांनी विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. बंडखोर आमदारांना त्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ही नावे वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले.
या पार्श्वभूमीवर गुवाहाटीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार गटाचे नाव “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असे ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करताना पहिल्या दिवशी ची भूमिका घेतली होती तीच कायम ठेवून आपण शिवसेना सोडली नाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडलेले नाही हेच यातून त्यांनी सिद्ध केले आहे.!!
त्याच बरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप समवेत येऊन सत्ता स्थापन करावी असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी 5 दिवसांपूर्वी केले होते केले होते, त्या भूमिकेपासूनही एकनाथ शिंदे दूर गेलेले दिसत नाहीत.
SBT : eknath shinde names his party Shivsena balasaheb Thackeray
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे बंड : ठाकरे – पवार सुरक्षा काढायला गेले; 38 आमदारांच्या सह्यांनिशी फुटीवर शिक्कामोर्तब झाले!!
- गुजरात दंगल : मोदींवरचे सर्व आरोप सुप्रीम कोर्टाने धुवून काढले; तिस्ता सेटलवाड, काँग्रेसवर अमित शहा यांचे शरसंधान
- द फोकस एक्सप्लेनर : ‘या’ राजकीय पक्षांनी कशी केली धूळफेक? जाणून घ्या, कसा चालतो राजकारणाच्या नावाखाली पैशांच्या गैरवापराचा गोरखधंदा?