विनायक ढेरे
नाशिक : सार्वजनिक गणेश उत्सवात विविध राजकीय नेत्यांची क्रेझ असणे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे वैशिष्ट्य आहेच… मध्यंतरीच्या काळात नेत्यांची क्रेझ कमी होऊन सिनेमाच्या हिरोंची क्रेझ वाढली होती, पण आता पुन्हा राजकीय नेत्यांची त्यातही स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी राजकीय नेत्यांची क्रेझ वाढलेली दिसत आहे. Savarkar’s craze in Ganeshotsav outside Maharashtra
कर्नाटकात बंगलोर, मेंगलोर, उडूपी आदी शहरांमध्ये 2022 मधील गणेश उत्सवात 300 हून अधिक मंडळांनी सावरकरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनी भरवली आहे, तर गुजरात मधल्या भडोच मधील टायगर ग्रुप नर्मदानगर मित्र मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय स्मारकात असलेल्या पुतळ्याची प्रतिकृती गणेशाच्या रूपात साकारली आहे. सावरकर खुर्चीवर बसून भाषणे करत असत. त्यावेळी त्यांचा हात आणि उंचावलेले बोट अशी लकब असे. तशाच रूपात गणेश मूर्ती मंडळांनी साकारली आहे.
आत्तापर्यंत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रूपात गणपती साकारलेले दिसले आहेतच, परंतु आता सावरकरांच्या रूपातला गणेश भडोच मध्ये टायगर ग्रुप नर्मदा नगर मित्र मंडळाच्या मंडपात विराजमान झाला आहे. त्याचबरोबर मंडळाने सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग देखाव्याच्या रूपाने साकारले आहेत. हा देखावा पाहण्यासाठी गुजरात बरोबर महाराष्ट्रातील गणेश भक्तही गर्दी करत आहेत.