यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे ७ ते ८ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.Satara: Mandhardevi’s pilgrimage to Kalubai canceled due to rising corona
विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.दरम्यान ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे ७ ते ८ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
यंदाची यात्रा १६ ते १८ जानेवारीपर्यंत नियोजीत आहे.यात्रेचा मुख्य दिवस १७ जानेवरी आहे. मात्र देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक यात्रेअगोदर १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस गर्दी दर्शनासाठी येतात.त्यामुळे १० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मांढरदेवी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
तसेच या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात.त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मांढरदेवीची यात्रा रद्द झाल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आला आहे.आता सलग येणाऱ्या यात्रा ही रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे संकेत देण्यात आला आहे.
काय आहेत नवे नियम?
१) गडावर गर्दी होईल अशा धार्मिक कार्यक्रम किंवा मिरवणूकांच्या आयोजन करण्यास बंदी घातली आहे.
२)यात्रा कालावधीत ट्रस्टी आणि पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी
३)यात्रा काळात भाविकांना तसेच स्थानिकांना तंबू उभारण्यास बंदी
४)तसेच पशू आणि पक्षी यांचा बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Satara: Mandhardevi’s pilgrimage to Kalubai canceled due to rising corona
महत्त्वाच्या बातम्या
- लालूंच्या जंगलराजची परंपरा पुत्र तेजप्रतापकडून कायम, कुख्यात गुन्हेगाराच्या पत्नीला बनविले विधायक प्रतिनिधी
- कोविड नियमांचा भंग झाल्यास ५० हजारापर्यंत दंड, सातत्याने नियमभंग केल्यास अटकही
- चंदीगडच्या महापौरपदी भाजप एक मताने विजयी, कॉँग्रेसची गोची झाल्याने आपला दिला नाही पाठिंबा
- मराठा आरक्षणावरील पुर्नविचार याचिकेवर १२ जानेवारीला सुनावणी, आता तरी राज्य सरकारने पूर्ण क्षमतेने लढण्याचे आवाहन