विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दोन्ही मुली सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. राऊत यांच्या पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार आहेत. त्यामुळे त्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत.Sanjay Raut’s two daughters are on ED’s radar, a partnership in the wine industry
जमीन घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काल ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्या चौकशीत त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांचं नाव समोर आले. यानंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला आहे. सुजित पाटकर हे मॅग्पी डीएफएस प्रा. लि कंपनीमध्ये भागिदार आहेत. संजय राऊत यांच्या पूवार्शी आणि विधीता या दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार आहेत.
सुजित पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने संयुक्तपणे अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ईडीकडून अलीबाग इथल्या जमिन व्यवहाराचीही चौकशी सुरु आहे. मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचाळ जमीन घोटळ्याप्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना काल अटक केली असून त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा जमीन घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवीण राऊत हे ऌऊकछची सहाय्यक कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत संचालक आहेत.दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांची चिडचिड सुरू झाली आहे. केला आहे.
राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई सुरु आहे, आधी लालच दाखवली, मग ऑफर्स दिल्या, त्यानंतर धमकावलं, तरीही झुकले नाही म्हटल्यावर कुटुंबीयांना धमकावलं जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया। चलता है, 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नहीं! असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut’s two daughters are on ED’s radar, a partnership in the wine industry
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; केंद्र आणि राज्य सरकारकडे चौकशीची मागणी
- भारतात पहिली EMU ट्रेन धावली ९७ वर्षांपूर्वी
- संसदेत भाषेवरून वाद : इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला ज्योतिरादित्य सिंधियांनी हिंदीत दिले उत्तर, थरूर म्हणाले – हा तर अपमान!
- मोठी बातमी : चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाला भारताचे राजदूत जाणार नाहीत, दूरदर्शनवर प्रसारणही नाही