• Download App
    मराठी पाट्या लवण्यावरून जलील यांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर। Sanjay Raut's response to Jalil's criticism of Marathi boards

    मराठी पाट्या लवण्यावरून जलील यांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

    शिवसेना उत्तर प्रदेशमधून 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. Sanjay Raut’s response to Jalil’s criticism of Marathi boards


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेना उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.शिवसेना उत्तर प्रदेशमधून 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    दरम्यान राज्यात दुकानांवरी मराठी पाट्यांबद्दल घेतलेल्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी यावेळी उत्तर दिलं.भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काहीही नाही असं राऊत म्हणाले.

    इम्तियाज जलील काय म्हणाले होते

    जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.



    जलील यांच्या टीकेला राऊतांचे उत्तर

    संजय राऊत म्हणाले की, आपण ज्या राज्यात राहतो, ज्या मातीमध्ये खातो तिचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. इम्तियाज जलील असो किंवा व्यापारी असो त्यांनी अशी वक्तव्य करणं म्हणजे बेईमानी असल्याचं देखील ते म्हणाले.तसेच शिवसेनेचा जन्मच यासाठी झाला असून, मनसेच्या सल्ल्यावरून शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही असा टोला देखील संजय राऊत त्यांनी लगावला.

    Sanjay Raut’s response to Jalil’s criticism of Marathi boards

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ