पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादांवर भाष्य केले.Sanjay Raut’s commentary on Shiv Sena and NCP disputes; Said – We do not drink from some glass, we do not have storms in the glass
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छगन भुजबळ यांनी नाशिकमधील वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, इतरांनी भाष्य करू नये असे म्हटल्याचे राऊतांना पत्रकारांनी सांगितले. यावर उत्तर देत राऊत यांनी छगन भुजबळ यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरत असल्याचं मत व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादांवर भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना त्यांनी राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत वक्तव्य केले. ’नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद मिटेल. आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी येतात ती मोठी येतात.
पुढे राऊत म्हणले की , ’ छगन भुजबळ महाविकासआघाडीचे सन्माननीय नेते, वरिष्ठ मंत्री आहेत. कधीकाळी ते शिवसैनिक होते. त्यांच्या ती रग अजूनही आहे. सुहास कांदे यांच्यातही आमदार म्हणून तशी रग आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखावा. एक आमदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत. त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आम्ही कुठं लक्ष घालतो. त्यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरतायेत. छगन भुजबळ यांच्याशी माझा चांगला संवाद आहे. तुम्ही नाशिकचा प्रश्न इथं का आणता? हे पुणे आहे, पुण्याविषयी बोला,’ असेही राऊत यावेळी म्हणाले. आणि यावर पुढे भाष्य करणं टाळलं.
Sanjay Raut’s commentary on Shiv Sena and NCP disputes; Said – We do not drink from some glass, we do not have storms in the glass
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या – काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यामुळेच पीएम मोदी अधिक शक्तिशाली झाले
- हम दो हमारे दो मुव्ही रिव्ह्यू
- Goa Elections : ‘आमच्या जाहीरनाम्यात जे काही आहे ती गँरटी आहे, आश्वासन नाही,’ काँग्रेस नेते राहुल गांधींचे गोव्यात प्रतिपादन
- ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा , दिवाळी बोनस म्हणून ‘इतके ‘ रुपये