विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे प्रेस क्लब द्वारा आयोजित जी एस करंदीकर स्मारक व्याख्यान समारंभामध्ये बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, 2024 मध्ये देशात गठबंधन मध्ये काँग्रेस सत्तेमध्ये येईल. सध्याचे एक पक्षीय भाजप शासनाला काँग्रेस समाप्त करेल कारण काँग्रेस ही देशातील एक प्रमुख पार्टी आहे.
Sanjay Raut targets BJP again! That said, Congress will come to power at the Center in 2024
राजनीती रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतेच विधान केले होते की, पुढील काही दशक भाजप सत्तेमध्ये राहील. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजप सत्तेमध्ये राहील पण विपक्ष म्हणून. सध्या भाजपपक्षाकडून असा दावा केला जातो की, भाजप ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. जेव्हा जगातील सर्वात मोठी पार्टी हरते तेव्हा ते सर्वात मोठे विरोधक बनतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच महाराष्ट्रामध्ये भाजपचे 106 उमेदवार निवडून आले होते. पण असं असतानाही ते सध्या विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत.
उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, सध्या आम्ही लक्ष दादरा, नगर हवेली आणि गोवा येथील पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी आहे.
Sanjay Raut targets BJP again! That said, Congress will come to power at the Center in 2024
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे