‘’…तर आवश्यकता भासल्यास संजय राऊतला सुद्धा आरोपी केलं पाहिजे’’, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
प्रतिनिधी
नागपूर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे उसळलेल्या दंगलीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ही दंगल सरकार पुरस्कृत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Sanjay Raut is trying to spoil the social environment of Maharashtra Chandrasekhar Bawankule
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’संजय राऊत हे वहायातपणा करत आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. संजय राऊत सारखा हा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो. त्यामुळे जर उद्या असे काही प्रकरणं झाली तर आवश्यकता भासल्यास संजय राऊतला सुद्धा आरोपी केलं पाहिजे.’’
याशिवाय, ‘’राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा बंद करावा. संभाजीनगरमध्ये सध्या शांतता आहे. मात्र सकाळी वाजत असलेला संजय राऊत नावाचा भोंगा बंद केला पाहिजे. अन्यथा जनता तो भोंगा बंद करेल.’’ असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले ? –
‘’महाराष्ट्रात सरकार, पोलीस, गृहमंत्री नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कुठे आहेत? संभाजीनगरमध्ये विनाकारण दंगल उसळली यामुळे उसळली, कारण २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सरकार पुरस्कृत दंगल आहे.’’ असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut is trying to spoil the social environment of Maharashtra Chandrasekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेने रशियामध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना तत्काळ देश सोडण्याचे केले आवाहन
- अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार!
- पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला अचानक भेट, बांधकाम कामगारांशी केली चर्चा
- ‘मी फरार नाही, मी बंडखोर आहे… मी लवकरच समोर येईन’, अमृतपालने जारी केला नवा व्हिडिओ