विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्र ईडीच्या कारवाईचे घुमताहेत “जोर”, तर दुसरीकडे आजच संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडे रंगल्या आहेत “बैठका”…!!Sanjay Raut ED: ED’s action in Mumbai
महाराष्ट्रात आज दिवसभर शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांच्या ईडी कारवाईच्या बातम्या जोरदार रंगल्या. खरे म्हणजे ईडीच्या कारवाईचा “जोर” गेल्या सहा-आठ महिन्यात जबरदस्तच वाढला आहे. महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बडे बडे नेते ईडी सीबीआयच्या कारवाईच्या “जोरा”त सापडले आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक आधीच आत मध्ये आहेत. त्यापाठोपाठ हसन मुश्रीफ यांचा नंबर लागताना दिसतो आहे आणि आज तर महाविकास आघाडीचे शरद पवारांखालोखालचे बडे नेते संजय राऊत यांच्याकडे ईडीने “जोराची धडक” मारली आहे…!!
एकीकडे मुंबईत ईडीने कारवाईचा “जोर” घुमवत संजय राऊत यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. तर नवी दिल्लीत संजय राऊत यांच्याकडे संध्याकाळी शिवसेना खासदारांची टी डिप्लोमसीची बैठक झाली. पवारांकडे डिनर डिप्लोमसी साठी आलेल्या काही आमदारांनी पवारांकडे जाण्यापूर्वी संजय राऊत यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय राऊत यांच्या निवासस्थानात मध्ये “बैठकांना जोर” आला. निर्णय काही झाला नाही. पण संजय राऊत यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार – खासदारांनी “नैतिक बळ” देणारा पाठिंबा दिला.
संजय राऊत यांना “नैतिक बळ” देऊन सध्या हे सगळे खासदार – आमदार शरद पवार यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी साठी जमले आहेत. अर्थातच या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने संजय राऊत यांच्यावरच्या ईडी कारवाईची चर्चा आहे किंबहुना कारवाईच्या आमदार जोरावरच पवारांच्या आणि राऊत यांच्या घरातल्या “बैठका” रंगत आहेत.
वास्तविक या सर्व नवोदित आमदार – खासदारांना शरद पवार यांच्याकडून दिल्लीच्या राजकारणाचे धडे घ्यायचे होते. परंतु, नेमका त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा “मुहूर्त” चुकला आणि त्यांना संजय राऊत यांच्यावरच्या आईडी कारवाईच्या “मुहूर्तात” अडकावे लागले.
दरम्यानच्या काळात मुंबईतही एक महत्वाची “बैठक” रंगली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या समवेत “बैठक” घेतली. बैठकीची बातमी आली. परंतु निर्णय काय झाला हे मात्र समजले नाही.