कंगना रनौतने महात्मा गांधींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (17 नोव्हेंबर, बुधवार) पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगना रनौतने म्हटले आहे. 1947 मध्ये भिकेत स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले (मोदी सरकार आल्यानंतर), असे ती म्हणाली होती. Sanjay Raut comments on bjp pm modi govt by responding over kangana raut statement on mahatama gandhi
वृत्तसंस्था
मुंबई : कंगना रनौतने महात्मा गांधींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (17 नोव्हेंबर, बुधवार) पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगना रनौतने म्हटले आहे. 1947 मध्ये भिकेत स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले (मोदी सरकार आल्यानंतर), असे ती म्हणाली होती.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘चीन आमच्या सीमेत घुसत आहे. आपण काय करत आहेत? हे केंद्रातील मोदी सरकारचे गाल पुढे करण्यासारखे आहे. काश्मीरमध्ये पंडित मारले जात आहेत. खूप काही चालले आहे. हे सगळं मॅडमला कळायला हवं. बरं, अशी काही मतं असू शकतात ज्यावर आपल्यात मतभेद असू शकतात. बाळासाहेबांनीही त्यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. परंतु स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची प्रमुख भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. महात्मा गांधी जगाचे महानायक होते आणि आहेत. मोदीजीही राजघाटावर जाऊन पुष्प अर्पण करतात, जगावर आणि देशावर आजही गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव आहे, आणि राहील.
‘देशाला खरा धोका नकली हिंदुत्ववाद्यांपासून’
काल झालेल्या महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचार हा जाणीवपूर्वक केलेला प्रयोग असल्याचे म्हटले होते. ठाकरे सरकार यात सहभागी आहे. हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. मात्र शिवसेना अजान करण्याच्या शर्यतीत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरली नसल्याचे म्हटले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, 24 कॅरेटची शिवसेना राहिली नाही.
या सर्वांवर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘देशाला खरा धोका बनावट हिंदुत्ववाद्यांपासून आहे. हे लोक निवडणुका आल्या की कुठेतरी दंगल घडवून आणण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे वातावरण तयार केले जाते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बनावट हिंदुत्ववाद्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्री
या राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही, हे माहीत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य स्वतःला मुख्यमंत्री समजतो. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘होय, या राज्यातील प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्री आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. ज्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मी मुख्यमंत्री आहे, असे वाटत असते, त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्री आणि आमदारालाही आपण मुख्यमंत्री असल्याचे वाटले पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला वाटत नाही की मी मंत्री आहे, तर एकाही खासदाराला वाटत नाही की मी खासदार आहे.”
Sanjay Raut comments on bjp pm modi govt by responding over kangana raut statement on mahatama gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली