Sunday, 11 May 2025
  • Download App
    महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड अनिल देशमुख पाठोपाठ आता ' या ' मंत्र्यांची विकेट।Sanjay Rathore and Anil Deshmukh in the Mahavikas Aghadi government resignation

    महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड अनिल देशमुख पाठोपाठ आता ‘ या ‘ मंत्र्यांची विकेट

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी युवतीच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा आरोपांच्या सीबीआय तपासणी आदेशानंतर राजीनामा दिल . यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. Sanjay Rathore and Anil Deshmukh in the Mahavikas Aghadi government resignation



    “अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,” अशी स्फोटक प्रतिक्रिया औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या यांनी परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. सोमय्या यांच्या स्फोटक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Sanjay Rathore and Anil Deshmukh in the Mahavikas Aghadi government resignation

    Related posts

    Understand Geo politics : ज्यावेळी अमेरिका आणि चीन उतरले पाकिस्तानच्या बचावात, त्याचवेळी काँग्रेस आणि विरोधक मोदी सरकारला घेरायच्या बेतात!!

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!