प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीने अटक केली आहे. संजय पांडेंची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांना रोज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १६ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कोठडीनंतर पांडे यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला आज त्यावर गुरूवारी न्यायालयाने संजय पांडेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे पांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. Sanjay Pandey’s stay in custody, court
केतकी चितळे प्रकरण : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट!!
संजय पांडेंनी अर्जात काय म्हटले?
आपण अनेक हायप्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आणि खटले चालवले. त्वरीत कार्यवाही देखील केल्या. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्याचा सध्याचे सरकार राजकीय सूड घेते आहे.
सन २००९ ते २०१७ दरम्यान कथितरित्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास २०२२ मध्ये केला जात आहे. म्हणजेच या प्रकरणाच्या सुरुवातीच्या 13 वर्षांनंतर आणि ते बंद झाल्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा सुरू झाले. तेही मी निवृत्त होऊन माझे कार्यालय सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत या चौकशीला सुरूवात झाली, यावरून हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. त्यामुळे आपल्याला ग्रामीण मंजूर करावा, असा युक्तिवाद संजय पांडे यांनी केला. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Sanjay Pandey’s stay in custody, court rejects bail plea
महत्वाच्या बातम्या
- अतिश्रम झाल्याने एकनाथ शिंदेंना डॉक्टरांचा आरामाचा सल्ला; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना!!
- नॅशनल हेराल्ड केस : सलग दुसऱ्या दिवशी ईडीची कारवाई, यंग इंडियाचे ऑफिस सील; राहुल कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले
- ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची संजय राऊतांची तक्रार; पण राऊतांच्या एसी ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ!!
- शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षावर दोन्ही बाजूंचे सुप्रीम कोर्टात “हे” झाले युक्तिवाद!!