वृत्तसंस्था
पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती खणखणीत व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक संजीवकुमार सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत यांनी ८० किलोमीटर अंतर पायी येऊन पंढरीची वारी पूर्ण केली आहे. Sangli’s Shiv Sainiks urges Vitthal for CM’s good health: Wari with wife
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आराम मिळावा, यासाठी त्यांनी वारी केली.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी येथील ते रहिवासी आहेत.
शस्त्रक्रिया झाल्यावर मुख्यमंत्र्यांना निरामय आरोग्य लाभावे, असे साकडे शिवसैनिक संजीवकुमार सावंत यांनी विठ्ठलाला घातले होते. त्यानुसार संजीवकुमार सावंत यांनी तीन दिवसात अनवाणी८० किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची विठ्ठलावर अढळ श्रद्धा आहे. हीच भावना ठेवून संजीवकुमार सावंत यांनी त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी सपत्नीक पंढरीची पायी वारी पूर्ण केली. त्यांना दीर्घायू लाभू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले.
Sangli’s Shiv Sainiks urges Vitthal for CM’s good health: Wari with wife
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी