- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला नवाब मलिक यांनी शेअर केला आहे .हा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे-पवार सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.तसेच त्यांना फाॅड देखील म्हटलंय. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे. SAMEER WANKHEDE: The birth certificate made viral by Malik is false; Will challenge in court; Sameer Wankhede’s reply to Nawab Malik
समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.
मलिक यांचं ट्विट
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते. समीर वानखेडेंवर केलेले हे आरोप खरे की खोटे हे लवकरच स्पष्ट होईल.
SAMEER WANKHEDE : The birth certificate made viral by Malik is false; Will challenge in court; Sameer Wankhede’s reply to Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण