क्रूझ ड्रग्जप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कायदा आपले काम करेल, असे वानखेडे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. Sameer Wankhede Reply On Nawab Malik Allegations says absolutly lie
वृत्तसंस्था
मुंबई : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कायदा आपले काम करेल, असे वानखेडे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
समीर वानखेडे जेव्हा एनसीबी कार्यालयात पोहोचले तेव्हा नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर तुमचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना समीर वानखडे म्हणाले की, नवाब मलिक यांचे आरोप खोटे असून कायदा आपले काम करेल.
नवाब मलिक यांच्या वतीने अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण घडवणारा व्यक्ती नवाब मलिकचा मित्र असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. नवाब मलिक म्हणाले की, माझा लढा कुणाच्या धर्म किंवा जातीशी नाही, तर माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे. ते म्हणाले, “पकडणारे बाहेरचा मार्ग शोधत आहेत आणि अपहरणकर्ते तुरुंगाच्या मागे आहेत, म्हणून काल मी लिहिले की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!”
ते म्हणाले, एखाद्यावर गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याला तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे. एनसीबी प्रकरण गुंतागुंतीचे करण्याचे काम करते. नवाब मलिक पुढे म्हणाले की, समीर वानखेडेच्या आईबद्दल मी कधीच काही बोललो नाही. मी त्याच्या पहिल्या पत्नीचा फोटो लावला तेव्हा लोकांनी विचारले की असे का केले? मला रात्री मेसेज आला की ज्या व्यक्तीचा फोटो आहे, त्याची इच्छा आहे. म्हणूनच फोटो टाकला.
ते म्हणाले, माझे कोणाशीही भांडण नाही. माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे. आज 100 हून अधिक लोक मुंबई कारागृहात आहेत, जे चुकीच्या पद्धतीने पकडले गेले आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांना पकडणे ही पोलिसांची जबाबदारी आहे, मात्र जे निर्दोष आहेत त्यांना सोडले पाहिजे आणि ज्यांनी या लोकांना अटक केली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे.
Sameer Wankhede Reply On Nawab Malik Allegations says absolutly lie
महत्त्वाच्या बातम्या