• Download App
    समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळाली नाही, एनसीबीतील सेवा संपली, आता या विभागाची जबाबदारी । Sameer Wankhede did not get extension, service in NCB ended, now the responsibility of this department

    समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळाली नाही, एनसीबीतील सेवा संपली, आता पुन्हा एकदा कस्टम्स विभागाची जबाबदारी

    Sameer Wankhede  : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांचे मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना त्यांच्या होम कॅडरमध्ये परत पाठवले आहे. गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाल्यानंतर वानखेडे घटनास्थळी होते आणि यादरम्यान चर्चेत राहिले. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना NCBचे मुंबई प्रादेशिक संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ ऑगस्ट २०२१ पर्यंत होता. त्यांना 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, जी 31 डिसेंबर रोजी संपली. यानंतर त्यांना पुन्हा होम कॅडर कस्टम विभागात पाठवण्यात आले आहे. Sameer Wankhede did not get extension, service in NCB ended, now the responsibility of this department


    प्रतिनिधी

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांचे मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना त्यांच्या होम कॅडरमध्ये परत पाठवले आहे. गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाल्यानंतर वानखेडे घटनास्थळी होते आणि यादरम्यान चर्चेत राहिले. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना NCBचे मुंबई प्रादेशिक संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ ऑगस्ट २०२१ पर्यंत होता. त्यांना 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, जी 31 डिसेंबर रोजी संपली. यानंतर त्यांना पुन्हा होम कॅडर कस्टम विभागात पाठवण्यात आले आहे.

    अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कथित बॉलीवूड ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाईच्या प्रकरणात वानखेडे यांचा समावेश होता. रिया चक्रवर्तीपासून इतर कलाकारांना त्यांच्या कार्यकाळात एनसीबीने अटक करून त्यांची चौकशी केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या टीमने मुंबईच्या किनारपट्टीवर एका क्रूझ जहाजातून ड्रग्ज जप्त केले होते आणि आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकारी राहिलेले वानखेडे यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि जात प्रमाणपत्र फसवणूक यासारख्या मोठ्या आरोपांचा सामना करावा लागला.

    राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी वानखेडे यांच्यावर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे यांनी सेवा मुदतवाढीची मागणी केलेली नाही. सप्टेंबर महिन्यात त्यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्याने ते चर्चेत आले. याप्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत.

    समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केले आहे. नंतर त्यांची कस्टम्सचे सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रेटींना पकडले ज्यांनी कस्टम्स चुकवले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये पोहोचले. प्रकरण स्वत:च्या हातात घेत त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना ‘गृहमंत्री पदक’ही देण्यात आले.

    Sameer Wankhede did not get extension, service in NCB ended, now the responsibility of this department

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य