प्रतिनिधी
नागपूर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हे दोघे आज संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सत्र संघाचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली वाहिली. या दोघांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यासंदर्भातले ट्विट स्वतः क्रांती रेडकर यांनी केले आहे. Sameer Wankhede, at Kranti Redkar Sangh headquarters
मात्र या ट्विटच्या आधारावर मराठी माध्यमांनी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे भाकीत केले आहे. विदर्भातील वाशिम राखीव मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला असल्याने समीर वानखेडे आपली सरकारी नोकरी सोडून वाशिम मधून निवडणूक लढवतील, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील मुख्यालयात आतापर्यंत अनेकांनी भेटी दिल्या आहेत. त्यापैकी प्रत्येकाने भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविल्या आहेत, असे नाही. तरी देखील हाय प्रोफाईल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या संघ मुख्यालयाच्या भेटीनंतर समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या. आहे.
अर्थात स्वतः वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी मात्र त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे समीर वानखेडे यांचे स्वतःचे इरादे आहेत की ते माध्यमांनीच उडविलेले पतंग आहेत हे समजायला सध्या तरी मार्ग नाही.
Sameer Wankhede, at Kranti Redkar Sangh headquarters
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
- महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!
- मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर