• Download App
    मराठा आरक्षणावर उद्या मुंबईत पत्रकार परिषदेत संभाजीराजे भूमिका मांडणार!! Sambhaji Raje will present his position on Maratha reservation in a press conference in Mumbai tomorrow

    मराठा आरक्षणावर उद्या मुंबईत पत्रकार परिषदेत संभाजीराजे भूमिका मांडणार!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मराठा आरक्षण आणि मराठा समाज या संदर्भातल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मराठा समाजातील विविध मान्यवरांशी आणि अन्य घटकांशी आपण चर्चा करून भूमिका निश्चित केली आहे. उद्या मुंबईत 11.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर करणार आहे, असे ट्विट राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.Sambhaji Raje will present his position on Maratha reservation in a press conference in Mumbai tomorrow

    खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेकदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला पत्र लिहिली आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. यापैकी फक्त सारथी संस्थेसंदर्भातली मागणी प्रत्यक्षात सरकारने मंजूर केली आहे. बाकीच्या मुद्द्यांवर अद्याप खासदार संभाजीराजे यांना सरकारने उत्तर दिलेले नाही.

    या पार्श्वभूमीवर उद्या संभाजीराजे हे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत कोणती भूमिका मांडतात?, मराठा आंदोलन संदर्भात ते काही वेगळी भूमिका घेतात का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चा किंवा तत्सम कोणते आंदोलन उभे करणार का?, असे सवाल आता विचारले जात आहेत. उद्या सकाळी 11.00 वाजता संभाजीराजे हे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात खुलासा करण्याची अपेक्षा आहे.

    Sambhaji Raje will present his position on Maratha reservation in a press conference in Mumbai tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस