विशेष प्रतिनिधी
सांगली : पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातील नव्हे तर जगातील करोना आटोक्यात येईल आणि नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती संभाजी भिडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. “आपल्या सर्वांना करोनामुक्त भारत व्हावा असे वाटते आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी,” असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. sambhaji bhide guruji makes anthoer contravarsial statement
आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्या करणारे लाखो वारकरी असून वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु वर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, असेही भिडे गुरूजींनी निवेदनात नमूद केले आहे.
चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेवून पालख्या निघाव्यात असे आश्वासन ठाकरे – पवार सरकारने दिले होते. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे – पवार सरकारने वारकर्यांचा विश्वासघात केला असून ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी सरकारचा विरोध झुगारून पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
sambhaji bhide guruji makes anthoer contravarsial statement
विशेष प्रतिनिधी
- पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये, बुरखा फाटतोय म्हणून धमक्या, शिवीगाळ, मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- ट्विटरवरील सर्व अश्लिल मजकूर काढून टाका, राष्टीय महिला आयोगाची दिल्ली पोलीसांकडे मागणी
- कोरोनाचे फुकट श्रेय घेणाऱ्या केजरीवालांना भाजपाने सुनावले
- केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा!, तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, आता इतक्या स्वस्त!