राज्य सरकार याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणू नये असे म्हटले आहे. Sakinaka rape case: State government to provide Rs 20 lakh to dead woman’s daughters
विशेष प्रतिनिधी
मुंबई : साकीनाका येथे महिलेवर बलात्कार झाला त्यानंतर त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एकूणच पोलिसांनी तातडीने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे.
राज्य सरकार याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणू नये असे म्हटले आहे.
तसेच सोमवारी (आज ) मुख्यमंत्री, गृहमंत्री ,मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांची बैठक पार पडली. यादरम्यान शासकीय योजनांमधून एकूण २० लाखांची मदत पिडीत महिलेच्या मुलींना देण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून घेतले आणि या घटनेकडे राज्य सरकार गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात यावा आणि तिच्या मुलींच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल असे आयोगास सांगितले.
Sakinaka rape case: State government to provide Rs 20 lakh to dead woman’s daughters
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा पवारांवर निशाणा
- Delhi Building Collapses : दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 2 मुलांचा मृत्यू
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन, मंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास
- ‘खुशाल तक्रार करा, दाव्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’, चंद्रकांत पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर