विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे. मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांनादेखील युवा साहित्य पुरस्कार आणि बाल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Sahitya Akademi Award 2022: Dr. Announced for Kiran Gurav’s book ‘Baluchya Avasthantarachi Diary’
हा पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. किरन गुरव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खेड्यापाड्यातील नव्याने लिहिणाऱ्या मुलांना कथा हा साहित्यप्रकार आणि त्यातल्या वेल्हाळपणामुळे खूप आपलासा वाटत असतो. बाळूच्या अवस्थांतराची डायरी ह्या शीर्षक कथेतील बाळू हा मुलगा या सर्व मुलांचे प्रतिनिधित्व करतो आहे.
शिक्षणासाठी शहराकडे गेलेल्या बाळूची स्थलांतराने आणि हळूहळू त्याचे मानसिक अवस्थांतर हा प्रवास ह्या पुस्तकामधून वाचायला मिळेल.
उपमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे, मराठी भाषा अभिजात आहे. मायमराठीचे वैविध्यपूर्ण साहित्य कृतींमधून नखे समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक साहित्यिक मोठय़ा उमेदीने करत असतात. त्यांच्या लेखन प्रवासाला साहित्य अकादमीने दिलेल्या पुरस्कारांमुळे आणखी बळ मिळते.
प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
Sahitya Akademi Award 2022: Dr. Announced for Kiran Gurav’s book ‘Baluchya Avasthantarachi Diary’
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा
- UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत
- मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!
- IMA, IIT दिल्ली आणि जामिया मिलियासह 6000 संस्थांचा FCRA परवाना कालबाह्य, परदेशी देणग्यांचा मार्ग बंद