Sadabhau Khot Criticizes NCP And Congress : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तवानंतर त्यांना झालेली अटक व सुटका यामुळे मागच्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात धुमशान सुरू आहे. शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. Sadabhau Khot Criticizes NCP And Congress Over BJP Shiv Sena Dispute In Nashik
विशेष प्रतिनिधी
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तवानंतर त्यांना झालेली अटक व सुटका यामुळे मागच्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात धुमशान सुरू आहे. शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सेना-भाजपच्या भांडणात दोन कोल्ह्यांची मजा
सदभाऊ खोत म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत. दोघांच्या भांडणात दुसराच कोल्हा स्वत:चे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की, शरद पवार यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती. अनिल परब यांसारख्या बुद्धिजीवी माणसानं असं करणं योग्य नाही. आग भडकवण्यासाठी, भाजप शिवसेनेत दरी वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला. राज्यातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात आहे. ही एकप्रकारची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
टोमॅटोला भाव द्या, अन्यथा आंदोलन
राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. वाहतूकही परवडत नाही. सरकारनं ठरवावं आणि भाव द्यावा. निव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये. राज्य सरकारनं सर्कस बनू नये आणि शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही, प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची तत्काळ मदत द्या. सरकारनं लक्ष दिलं नाही तर आंदोलन करू, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला.
Sadabhau Khot Criticizes NCP And Congress Over BJP Shiv Sena Dispute In Nashik
महत्त्वाच्या बातम्या
- Justice BV Nagarathna Profile : २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनणार बी. व्ही. नागरत्ना, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही…
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
- सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
- Bengal Post Poll Violence : सीबीआयने 9 केसेस नोंदवल्या; लवकरच तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांच्या चौकशीची शक्यता
- All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, 565 जणांना आणले