• Download App
    अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार sachin vaze letterbomb; anil parab ready to face narco test, NIA,CBI, RAW probe, but refuse to resigne from cabinet

    अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – सचिन वाझेंचा लेटरबाँम्ब आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची एनआयए, सीबीआय, अगदी रॉ या संस्थांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण त्यांनी मंत्रीपद सोडण्यास नकार दिला आहे. sachin vaze letterbomb; anil parab ready to face narco test, NIA,CBI, RAW probe, but refuse to resigne from cabinet

    सचिन वाझेंच्या पत्रातून परिवहन मंत्री अनिल परब यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पण, अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.



     

    अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंच्या पत्रातील सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, की ‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले हे आरोप आहेत. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.

    आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात पत्र दिले आहे. त्यात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. जून ऑगस्ट 2020 ला वाझे ला SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आरोप केला आहे. जानेवारी 2021 ला मी मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. मूळात हे दोन्ही आरोप खोटे आहेत. त्यांचे पत्रही खोटे असेल, असा दावा परब यांनी केला.

    सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र आहेत. सचिन वाझे हा कोठडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. पण अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम केले जात आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते, प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते, हे मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असं काम करायला सांगितलं नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

    परब म्हणाले, की आजच्या पत्रात माझ्यावर, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी आज कुठल्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. मला चौकशीला बोलवावे मी जायला तयार आहे. सीबीआय चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र समोर आले आहे. परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिले त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. एनआयए स्फोटकांचा तपास करते आहे पण त्याचा शोध अजून लावला नाही, माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे. एनआयए, सीबीआय, रॉ कोणतीही चौकशी लावली तरी मी तयार आहे. पण मी मंत्रीपद सोडणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.

    sachin vaze letterbomb; anil parab ready to face narco test, NIA,CBI, RAW probe, but refuse to resigne from cabinet

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा