Sachin Vaze Case : राज्यातील 100 कोटींच्या खंडणीखोरीच्या परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात जाईल असे वाटत असतानाच आता यात नवनवीन खुलासे सुरूच आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पाच पानांचा अहवाल गृह विभागाला पाठविला आहे. या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना मोकळीक दिल्याचा आरोप आहे. Sachin Vaze Case 5 page report of Mumbai Police to Home Department, allegations on Parambir Singh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील 100 कोटींच्या खंडणीखोरीच्या परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात जाईल असे वाटत असतानाच आता यात नवनवीन खुलासे सुरूच आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पाच पानांचा अहवाल गृह विभागाला पाठविला आहे. या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना मोकळीक दिल्याचा आरोप आहे.
आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या अहवालात असे लिहिले आहे की, सचिन वाझे यांची नेमणूक तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांच्या तोंडी सूचनांवरून क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये करण्यात आली होती. वाझे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारून थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. आयुक्त हेमंत नगराळे यांच्या अहवालानंतर माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यासह आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, सचिन वाझे यांचा गॉडफादर कोण होता?
आयुक्त नगराळे यांच्या अहवालातल टॉप 10 मुद्दे…
- गृह विभागाला मुंबई पोलिसांचा अहवाल देण्यात आला आहे, त्यानुसार सचिन वाझे थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याखाली कार्यरत होते. सचिन वाझे गुन्हे शाखेच्या कोणत्याही उच्च अधिकाऱ्यांना रिपोर्ट करत नव्हते.
- 5 पानांच्या या अहवालात सचिन वाझे यांची सेवेत पुन्हा नियुक्ती झाल्यापासून ते 9 महिन्यांपर्यंतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
- या अहवालातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सचिन वाझे यांची 8 जून 2020 रोजी मुंबई पोलिसांच्या एलए म्हणजेच सशस्त्र दलात नियुक्ती करण्यात आली होती. सचिन वाझे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) अतिरिक्त पोलीस आयुक्त (एलए) आणि मंत्रालय डीसीपी यांनी घेतला. ही एक नॉन-एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग होती जी सहसा निलंबित अधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्तीनंतर दिली जाते.
- यानंतर 8 जून 2020 रोजी सचिन वाझेंवरून पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे यांना मुंबई गुन्हे शाखेत नेमण्याचे आदेश मंजूर झाले. 9 जून 2020 रोजी तत्कालीन जॉइंट सीपी क्राइम यांनी वाझे यांची क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये पोस्टिंग दाखवली.
- अहवालात असे लिहिले आहे की, मुंबई पोलीस आयुक्तांच्या तोंडी आदेशानुसार तत्कालीन गुन्हे आयुक्त विनय घोरपडे आणि क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत सुधाकर देशमुख यांना तेथून दुसर्या ठिकाणी बदली करण्यात आली.
- तत्कालीन जॉइंट सीपींनी या पोस्टिंगला विरोध केला. मुंबई पोलिसांच्या अहवालात विशेष उल्लेख करण्यात आला आहे की, सीआययूमध्ये सचिन वाझे यांच्या नियुक्तीला गुन्हे सहआयुक्तांनी विरोध दर्शविला होता. पण मुंबई पोलीस आयुक्तांच्या दबावाखाली त्यांनी सीआययूमध्ये नियुक्तीच्या आदेशानुसार वाझे अनिच्छेने सही केली.
- मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार सीआययू प्रभारी पद पीआयची असूनही एपीआय सचिन वाझेंना देण्यात आली होती आणि हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या तोंडी आदेशानंतर झाले.
- अहवालानुसार, गुन्हे शाखेत अहवाल देण्याच्या यंत्रणेअंतर्गत तपास अधिकारी युनिट प्रभारीला रिपोर्ट करतात. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांसह युनिट प्रभारी एसीपी, त्यानंतर डीसीपी, अतिरिक्त सीपी आणि जॉइंट सीपी यांना रिपोर्ट करतात. परंतु एपीआय सचिन वाझे या सर्वांना बायपास करून थेट मुंबई पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करायचे आणि त्यांच्या सूचनेनुसार काम करायचे. कोणावर कारवाई करावी, कुठे छापे घालायचे? थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडून अटक करण्यासाठी आणि कोणाची साक्ष घ्यायची याच्या सर्व सूचना घेत असत.
- सचिन वाझे यांनी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना कठोर सूचना केल्या होत्या की, त्यांनी कधीही गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊ नये. स्वत: सचिन वाझे हे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कधीच रिपोर्ट देत नव्हते. कधी-कधी केवळ अनौपचारिकपणे विचारल्यावर माहिती देत असत.
- एवढेच नव्हे, तर मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सचिन वाझे स्वत: मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ब्रीफिंगमध्ये हजर होते आणि नंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत. एपीआय सचिन वाझे यांना 9 महिन्यांच्या कार्यकाळात 17 मोठ्या केसेस देण्यात आल्या होत्या.
Sachin Vaze Case 5 page report of Mumbai Police to Home Department, allegations on Parambir Singh
महत्त्वाच्या बातम्या
- स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती
- Mask Mandatory While Driving : कारमध्ये एकट्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
- कोरोना रुग्णसंख्येने मोडले पुन्हा सर्व रेकॉर्ड, 24 तासांत 1 लाख 15 हजार नवीन रुग्णांची नोंद, जगात सर्वाधिक आकडा
- RBI Credit Policy : व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, RBIचा 10.5% जीडीपी ग्रोथचा अंदाज
- वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण