• Download App
    सचिन वाजे यांचा एनआयएवर टॉर्चर केल्याचा आरोप, म्हणाले - अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्या! । Sachin Vaje accuses NIA, says agency did torture; Forcibly signed on many documents

    सचिन वाजे यांचा एनआयएवर टॉर्चर केल्याचा आरोप, म्हणाले – अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्या!

    अँटिलिया प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी एनआयएवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाजे यांनी एनआयए कोठडीत टॉर्चर करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच तपास यंत्रणेने अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करून घेतल्याचा आरोप वाजे यांनी केला आहे. Sachin Vaje accuses NIA, says agency did torture; Forcibly signed on many documents


    वृत्तसंस्था

    मुंबई : अँटिलिया प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी एनआयएवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाजे यांनी एनआयए कोठडीत टॉर्चर करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच तपास यंत्रणेने अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करून घेतल्याचा आरोप वाजे यांनी केला आहे.

    मंगळवारी सचिन वाजे एकसदस्यीय चांदीवाल चौकशी आयोगासमोर हजर झाले. अँटिलिया प्रकरणात अटक झाल्यानंतर एनआयए कोठडीत घालवलेला काळ हा आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी काळ होता, असे त्यांनी आयोगाला सांगितले. दबावाखाली अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचा दावाही केला. आयोगासमोर झालेल्या उलटतपासणीत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाजे यांनी हा दावा केला.



    देशमुख १५ नोव्हेंबरपासून कोठडीत

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मार्चमध्ये न्यायमूर्ती केयू चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. राष्ट्रवादीचे नेते देशमुख हेही मंगळवारी आयोगासमोर हजर झाले. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर 15 नोव्हेंबरपासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या मंगळवारी झालेल्या भेटीप्रकरणी महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंग सोमवारी चौकशी आयोगासमोर हजर झाले, तेव्हा दोघांची भेट झाली होती.

    Sachin Vaje accuses NIA, says agency did torture; Forcibly signed on many documents

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस