Sachin Tendulkar : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. सचिनने ट्विट केले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी लवकरच बरा होऊन परत येईन. तत्पूर्वी, 27 मार्च रोजी सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाली होती, बहुधा संसर्ग वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Sachin Tendulkar admitted to the hospital, He Dignosed Corona Positive on March 27
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. सचिनने ट्विट केले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी लवकरच बरा होऊन परत येईन. तत्पूर्वी, 27 मार्च रोजी सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाली होती, बहुधा संसर्ग वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सर्व भारतीय आणि माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 2 एप्रिल 2011 रोजी भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. 1983 नंतर टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची ही दुसरी वेळ होती.
27 मार्चला झाला होता संसर्ग
27 मार्च रोजी सचिन तेंडुलकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी ट्विटद्वारे त्याबद्दल माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाले की, त्यांनी स्वत:ला घर विलगीकरणात ठेवले आहे. याव्यतिरिक्त ते या साथीच्या रोगाशी संबंधित सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर संपूर्ण कुटुंबीयांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यात सर्वांचा अहवाल नकारात्मक आला होता.
सचिन यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं की, मी नियमितपणे टेस्ट करत आलो आहे. कोरोना टाळण्यासाठी मी सर्व पावले उचलली. परंतु तरीही कोरोना पॉझिटिव्ह आढळलो. घरातील इतर सदस्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. सचिनने पुढे लिहिलं की, मी घरी स्वत:ला विलगीकरणात ठेवलंय. डॉक्टरांच्या सूचना पाळतोय. मला साथ देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार. आपण सर्वजण स्वत:ची काळजी घ्या.
नुकत्याच रायपूर येथील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सचिन तेंडुलकर खेळले होते. ते इंडिया लिजेंडचा कर्णधार बनले होते. त्यांच्याशिवाय या स्पर्धेत खेळणाऱ्या युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस. बद्रीनाथ यांनाही कोरोनाची लागण झालीय. या स्पर्धेत युवराज सिंग, वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज खेळाडूदेखील सहभागी होते.
Sachin Tendulkar admitted to the hospital, He Dignosed Corona Positive on March 27
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझेंचे दाऊद कनेक्शन :अंबानी-स्कॉर्पिओ-अंडरवर्ल्ड-बनावट दहशतवाद असा रचला कट ; सर्वात मोठा धक्कादायक खुलासा ; ‘ हिरो’ बनण्यासाठी अंडरवर्ल्ड ‘व्हिलन’ची साथ?
- तैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 36 जणांचा जागीच मृत्यू, 72 जण जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती
- ब्रिटनमध्ये नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास, निर्बंध शिथील करण्यास सुरुवात
- कोरोनाचा फटका बसलेला जागतिक व्यापार चालू वर्षांत मात्र वाढण्याचा अंदाज
- Corona 2nd Wave In India : देशात 24 तासांत 81 हजार रुग्ण, 469 मृत्यू, रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा 1ला नंबर