गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील या पुण्यातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज होत्या.Rupali Patil held a press conference and castigated MNS deputy leaders; Said …..
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याआधीच मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मनसेच्या उपनेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील या पुण्यातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज होत्या. या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे.
रुपाली पाटील यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असताना देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. लवकर रुपाली पाटील राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे असंही त्यांनी सांगितलं.