विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्य महिला आयोगावर अध्यक्षपदासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केली आहे. या पदासाठी रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत असल्याने चित्रा वाघ यांनी हे ट्विट अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांना संबोधून केली असल्याचे बोलले जात आहे.
Rupali Chakankar reply to Chitra Wagh’s statement on women commission chief
चित्रा वाघ यांची ट्विट
चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटवरून असे बोलले जात आहे की हे ट्विट हे अप्रत्यक्षपणे रूपाली चाकणकर यांना निर्देशून केले गेले आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी असे म्हटले आहे की, “या आयोगावर अनुभवी अध्यक्ष नेमावा आणि जर मिळत नसेल तर रावणाला मदत करणाऱ्या शूर्पणखाला बसू नका.”
रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अप्रत्यक्ष शब्दातच प्रतिउत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “कोरोना पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न आहेत आणि जनता अजून सावरते आहे. इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही.” एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य निभावणे गरजेचे आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, महिलांची सुरक्षितता, सबलीकरण तसेच सक्षमीकरणावर आमचे लक्ष आहे आणि आम्ही इतर किरकोळ गोष्टींकडे लक्ष देत नाही. “राज्याच्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे”
Rupali Chakankar reply to Chitra Wagh’s statement on women commission chief
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही
- दसरा मेळाव्यासाठी संघ दक्ष, नागपुरात जय्यत तयारी ; सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप
- नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका