• Download App
    रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागणRupali Chakankar infected with corona

    रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

    सकाळी भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसिद्ध गायक सोनू सूद यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली.Rupali Chakankar infected with corona


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच अभिनेते कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.अशातच राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कोरोना झाल्याची माहिती आहे.

    तसेच सकाळी भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसिद्ध गायक सोनू सूद यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली.रुपाली चाकणकर यांनी कोरोना झाल्याची माहिती स्वत: ट्विट करत दिली आहे.



    “सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन”, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय.

    Rupali Chakankar infected with corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    विरोधी पक्षनेते पदांवरची नावे बदलून भाजपची महाविकास आघाडीत पाचर!!

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच

    Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- वेगळ्या विदर्भाचा आमचा अजेंडा कायम; आम्ही त्यावर काम करत आहोत