• Download App
    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणे नाही, निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारवर मोक्का लावावा, निलेश राणे न्यायालयात याचिका दाखल करणार|Rulers should not be held accountable even if people die, but should be blamed on a careless government,Nilesh Rane to file petition in court

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणे नाही, निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारवर मोक्का लावावा, निलेश राणे न्यायालयात याचिका दाखल करणार

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणेनाही. जाणून बुजून केलेला हा गुन्हा आहे. त्यामुळे यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, अशी मागणी माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे. न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Rulers should not be held accountable even if people die, but should be blamed on a careless government,Nilesh Rane to file petition in court


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी: राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणेनाही. जाणून बुजून केलेला हा गुन्हा आहे. त्यामुळे यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, अशी मागणी माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे. न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    राणे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे आरोग्य व्यवस्था नाही, तुम्ही फक्त लसींचा पाठलाग करताय, राज्यकर्त्यांना लोकांचे काही देणे-घेणे नाही, लोक मेले तरी चालतील. हा जाणूनबुजून केलेला गुन्हा आहे,



    त्यामुळे यांच्यावर मोक्का लावला पाहिजे, जेव्हा संघटित गुन्हा (ऑर्गनाईझ क्राईम) होतो तेव्हा मोक्का कायदा लावला जातो.हा संघटित गुन्हा नाही का? लोकांना ठरवून मारलं जातंय, हकनाक लोकं मरतायत याला जबाबदार कोण?

    मानवी जीवनाकडे दुर्लक्ष कायद्यांतर्गत मी न्यायालयात जाणार असल्याचे सांगून राणे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर जनहित याचिका दाखल करणार आहे. लॉकडाऊन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला भिकेला लावणार आहेत.

    मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा विषय म्हणजे लॉकडाऊन, ते बेरोजगारीवर काही बोलत नाहीत, व्यापारी रस्त्यावर आहेत. रिक्षा, बस, टॅक्सी चालू आहेत, पण गार्डन बंद,ऑफिसेस बंद, दुकानं बंद आहेत. मग लोकं जाणार कुठे? लॉकडाऊनशिवाय मुख्यमंत्र्यांना काही दिसत नाही आणि काही कळतही नाही,

    यांचा पहिला उपाय पण लॉकडाऊन, मधला उपाय लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॉकडाऊन. त्यामुळे यांनी मातोश्रीचं नाव बदलून लॉकडाऊन करून टाकावे. मुख्यमंत्र्यांना राज्य चालवणं जमत नाही, राज्य हे अधोगतीकडे चाललं आहे.

    मुख्यमंत्र्यांनी हे जर आत्ताच थांबवलं नाही, तर महाराष्ट्रात भयानक परिस्थिती उभी राहील. लोकंच आता म्हणायला लागली आहेत, कोरोना जाऊ द्या, आम्ही भुकेने मरू, तुम्ही काही देऊ नका, आमचं आम्हाला कमवू द्या, ही आज परिस्थिती आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वात जास्त वाट अजित पवार यांनी पुण्याची लावली. यांचे बोलणं काय आणि वागणं काय, एरव्ही तोंडावरचे मास्क न काढणारे अजित पवार पंढरपुरात जाऊन भरगच्च सभा घेतात.

    काल सांगतायत लॉकडाऊन लावावा लागेल, लाज वाटत नाही का तुम्हाला? अनिल परब यांना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक होती, आता ठाकरे सरकारला कोरोनाचं कारण मिळालंय.

    Rulers should not be held accountable even if people die, but should be blamed on a careless government,Nilesh Rane to file petition in court

    वाचा…

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!