रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याने हे आदेश काढले आहेत. Ruby hall clinic human organ transplant surgery licence suspended by Maharashtra health department
एका महिलेला 15 लाख रुपयांचे अमिष दाखवून, ती रुग्णाची नातेवाईक असल्याचे दर्शवणारे बनावट कागदपत्रे बनवून तिच्या किडनीची तस्करी केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनकला कारणे दाखवा नोटीस पाठवून “अवयव प्रत्यारोपणाचा परवाना रद्द का करू नये’ अशी विचारणा केली होती. त्याला 24 तासांत उत्तर देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार रुबी हॉल क्लिनिकने त्याला उत्तर दिले. याशिवाय या प्रकरणावर राज्य सरकारने “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील’ सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे.
त्या समितीचे चौकशीचे काम सुरू असून, ससूनमधील अवयव प्रत्यारोपण पडताळणी समितीतील सदस्यांचीही त्यांनी चौकशी केली असून, रुबी हॉल क्लिनिकमधील संबंधितांची चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे, हा अहवाल येईपर्यंत त्यांची अवयव प्रत्यारोपणाची मान्यता काढून घेण्यात आली आहे.
Ruby hall clinic human organ transplant surgery licence suspended by Maharashtra health department
महत्त्वाच्या बातम्या
- भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले
- समाजवादी पक्षाचा सपाटून पराभव, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
- Raj Thackeray : ‘देशात समान नागरी कायदा तातडीने लागू करा,’ विराट उत्तरसभेत राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- Raj Thackeray : महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर ईडीचे छापे; राज ठाकरेंनी उलगडले पवार – मोदींचे “रहस्य”!!